मुलांचे मासिक तर्फे जानेवारी विज्ञान विशेषांक जानेवारी 2023 यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात विज्ञानाची भविष्यातील झेप, दैनंदिन जीवनातील विज्ञान, व अद्भुत अंतरिक्ष अशा या विषयांवर राज्यातून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांकडून चित्र मागविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण व मुलांचे मासिक विज्ञान विशेषांक प्रकाशन सोहळा 22 जानेवारी 2023 रोजी नागपूर येथे पार पडला. माझा लहान भाऊ अन्वेष डोंगे यांनी या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वर्ग आठ ते दहा गटात प्रथम क्रमांक पटकावला, काही कारणास्तव तो व माझे काका या सोहळ्याकरिता उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे बक्षीस स्वीकारण्यासाठी मी तिथे उपस्थित राहिलो.

Mulanche Masik

Image courtesy: Times of India 

या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री विकास सिरपूरकर, गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार, 'बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके आणि खातनाम चित्रकार व बसोली ग्रुपचे संस्थापक श्री चंद्रकांत चन्ने असे हे सर्व मंडळी उपस्थित होते या सर्व मान्यवरांचे विचार या कार्यक्रमातून ऐकायला मिळाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन पार पडल्यानंतर सूत्रसंचालकांनी सर्वप्रथम श्री चंद्रकांत चन्ने सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. चंद्रकांत सर गेली पन्नास वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत आहेत ते म्हणाले त्यांना आजचा दिवस खूप विचित्र वाटतो की विज्ञान या विषयावर मुलांची चित्रकला स्पर्धा आणि त्यात त्यांनी वापरलेले लॉजिक, सरळ भाषेत एक अधिक एक दोन पण चित्रकलेत मात्र ते मुलं जी साकारेल तेच असतं.

child wants to be illogical, don't ask him to be logical

आणि त्यात विज्ञान विषयावर चित्रकला स्पर्धा आणि त्यासाठी धडपड करणारी मुलं हे पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे मुलांची ती illogical गोष्ट जी की विज्ञानाला कधीच मान्य नसते उदाहरणार्थ एका मुलाने मोराचे चित्र साकारले आणि आईला दाखवले आईने ते पाहून कुतूहल व्यक्त केले की मोराला चार पाय दोन हात चार कान पण असू शकतात! त्यावर तो म्हणाला की, "जर वाघ मागे लागला तर त्याला जोरात धावता आलं पाहिजे ना!" पण ते त्या मुलांनी किती उत्सुकतेने आणि निर्भीडपणे साकारली.


विज्ञान म्हंटले की मुलांनी टेलिस्कोप, रॉकेट, विज्ञानातील नियमाप्रमाणे तारे वगैरे साकारावे तसे कधीच अपेक्षित नसावे आणि त्या मुलाची अभिव्यक्ती व विज्ञानाची अभिव्यक्ती ही वेगळी असते आणि त्यामुळे ती सुंदरता व ही अमोलता एकत्र आली की काहीतरी छान घडतात, निश्चितच! मग या कडक उन्हात सूर्याला हातात छत्री देणारी पण मुलं पाहिली आहेत, ती चुकत नाहीत कुठे कारण या अशा उन्हाळ्यात आम्हाला कुलरच्या हवेत बसायला आवडतं मग सूर्याने काय पाप केलंय? आणि अशा धाडसांनीच ही विज्ञानाच्या पलीकडे विचार करणारी मुलं आहेत.


चंद्रकांत सरांनी असा उल्लेख केला की त्यांना दीड लाख मुल आहेत, गेली पन्नास वर्षे शाळा चालवत असताना अशी कित्येक मुलं आपल्या परिवारासारखी राहतात. त्यातील एका लहान मुलांनी एका कुत्र्याचे चित्र साकारून त्याला निळा रंग दिला, त्यावर पालकांनी त्याला विचारलं की तुझा कुत्रा निळा कसा रे? कुत्रा हा निळा असतो का? पण ते पालकांना असं म्हणतात की आपण पालकांनी त्यात लॉजिक का शोधायचं? कारण तो त्याचा कुत्रा आहे तो हिरवा करेल, निळा करेल ते त्याचं स्वातंत्र आहे! त्यांनी खूप महत्त्वाचा वाक्य म्हटलं की

चांगले पालक असणे प्रत्येक मुलाचा अधिकार आहे

मुलांना त्यांच्या परीने विचार करण्याचा स्वातंत्र्य हे पालकांनी दिलं पाहिजे. चित्रकलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या मते ज्या पालकांचं आपल्या मुलाकडे पूर्ण दुर्लक्ष असतं चित्रकलेत तो बेस्टच असतो.

या कार्यक्रमात लहान मुलांसोबत त्यांच्या आजीआजोबाची पण उपस्थिती भरपूर प्रमाणात होती. त्यावर ते म्हणाले की मागील वीस-पंचवीस वर्षात आजोबांना एवढं फार महत्त्व नव्हतं घरामध्ये, पण आज आहे! आजोबा ही Respected नाही तर सर्वात Wanted व्यक्ती आज आपल्या आयुष्यात आहेत जे महत्त्वाचे भूमिका पार पाडतात. असं म्हणतात की मुलांची चित्र, रंग, रेषा हे सर्व काहीतरी सांगतात, पण त्याचा चित्र बोलत नाही तर त्याचं घर बोलत. आता एका मुलाने घरासमोरील फाटकाचं चित्र काढलं आणि त्याला प्रमाणापेक्षा मोठा कुलूप दाखवलं मग त्याला विचारलं की तुझं फाटक तर खूपच छान आहे! पण कुलूप एवढं मोठं का? त्यावर तो म्हणाला की "हे माझ्या घरचं फाटक आहे सकाळी माझा दादा गाडीवर कॉलेजला जातो बाबा पण ऑफिसला जातात माझी आई टीचर आहे", शिक्षक हा शब्द कठीण आहे ना उच्चार करायला म्हणून टीचर! "मग ती जाताना करू घराला कुलूप लावून चावी मावशीकडे ठेवते आणि सांगते की घराकडे लक्ष असू द्या कारण ती सगळ्यात शेवटी जाते मग सर्व जबाबदारी पण तिचीच असेल ना!" बाजूला बसलेल्या मुलांनी पण फाटकाचे चित्र काढले पण त्याला कुलूप लावलेलं नव्हतं मग त्याला विचारलं की तू का नाही काढलं कुलूप? त्यावर तो म्हणाला की, "माझ्या घरी आजी असते ना! तिला जर बाहेर जायचं असेल तर ती कशी जाईल?" यावरून असे लक्षात येते की ते आपली भावना निरागसपणे चित्राच्या माध्यमातून व्यक्त करतात.

यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती श्री विकास सिरपूरकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यात त्यांनी मुलांचे मासिक चे संपादक जयंत मोडक यांचे अभिनंदन करत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की मुलांचे मासिक त्यांनी 1951 साली वाचायला सुरुवात केली त्यांच्या वडिलांनी त्यांना ते आणून दिलं तेव्हापासून त्यांना वाचनाची आवड व सवय लागली, ते कोणतेही पुस्तक अधाशासारखे वाचून काढत असत. प्रामुख्याने त्यांनी काही पुस्तकांचा उल्लेख केला जसे टारझन असेल महाभारत, रामायण इत्यादी.
तसंच चित्रकलेचही असतं, चित्र बोलतात हे त्यांना भौगोलिक नकाशे पाहताना वाटायचं! वाचनाची जी गोडी त्यांना लागली त्यातून त्यांना खूप फायदा झाला असं त्यांनी सांगितलं.

Drawing is nothing but the expressions.

मुलांना थांबवू नका त्यांना चित्र काढू द्या त्यांना इमॅजिनेशन करू द्या त्यांच्या दृष्टीने कुत्रा निळा असला तरी तो असू द्या तुम्ही ते सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, त्यांच्यावर आपली संस्कार सुपर इम्पोज करू नका, ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने स्वतःला एक्सप्रेस करत असतात.
let them go grow naturally

मुलांचे मासिक यासाठी लिहिणाऱ्या लेखकांचे पण त्यांनी कौतुक केले मुलांच्या सर्जनशील ते मध्ये पालकांचा सहभाग असावा, मग त्याला घडवायची गरज नाही तो आपोआप घडतोच तो पाहतो निरीक्षण करत असतो त्यावर आपल्या अपेक्षा लादणेही चुकीचे आहे. चित्रकलेच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच पालकांना असं वाटतं की मुलगा चित्रकलेकडे आवड दाखवायला लागला की तो भरकटला आता त्याचं करियर कसं होणार पण ही भावना पूर्णपणे चुकीचे आहे.

आर्टिस्ट कडे आजही महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाहण्यात येत नाही, याचा एक गमतीशीर उदाहरण असं सांगितलं की कलेमध्ये पीएचडी करूनही बायकोसाठी साडी घ्यायला गेल्यास ती म्हणते की तुम्हाला रंगातलं काहीच कळत नाही!

नंतर संपादक जयंत मोडक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले सर्व मान्यवरांचे विचार व्यक्त झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ झाला. मी माझा भाऊ अन्वेष डोंगे व इतर चार विद्यार्थी अथर्व फुलारी अमृता केजकर, समृद्धी करपे व हर्षद बन या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने श्री विकास शिरपूरकर यांच्याकडून बक्षीस स्वीकारले माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण होता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बक्षीस स्वीकारताना मलाही खूप आनंद झाला.

या सोहळ्यातून खूप काही शिकायला मिळालं खूप काही नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या आदरणीय मान्यवरांचे विचार कानावर पडले याचा खूप प्रभाव जाणवतोय, सर्वांचे खूप खूप आभार!